2024-09-07 06:00
आद्य दैवत साऱ्या जगाचे,
पूजन करुया गणरायाचे!
ज्या सणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस अखेर उजाडला आहे. आज घराघरात लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणाची वाट धरली आहे, गणेश भक्तांसाठी हे दहा दिवस मोठ्या जल्लोषाचे असतात. सर्वत्र बाप्पाचे देखणे रूप पाहायला मिळते.