2024-10-21 17:09
words#writer
प्रेम काय आहे हे सांगशील का?
तुझा नावाचा जप माझ्या,
हृदयातला ऐकशील का?
का वेड केलास मनाला,
एकदा सांगून जाशील का?
वाट तुझी बघते,
भेटायला मला येशील का.
विसरलास मला तरी चालेल,
पण स्वप्नात माझा येशील का?
भरलेल्या डोळ्यांना एक, हलकी
झुळूक वाऱ्याची देशील का?
आठवणीत माझा राहतोस तसा
आठवणीत मला तु ठेवशील का?
स्वप्नाच्या दुनियेत तरी,
फक्त माझाच
एकदा होशील का?
- अंजली भवर