2024-10-23 15:43
हसरा चेहरा, पण दु:खी मन,
बाहेरून प्रकाश, आतून काळोख दाटलेलं जन.
दुसऱ्यांसाठी हसत राहतो, स्वतःची वेदना लपवून,
मनाच्या कोपऱ्यात कुणालाही न सांगितलेलं दुःख ठेवून.
हसण्यामागचं दुःख, कुणीच कधी समजत नाही,
मनाच्या गाभाऱ्यात किती वादळं चाललीत, ते कुणालाही कळत नाही.
पण तरीही, हा हसरा चेहरा सवयीनं पुढं येतो,
आणि मनाचं दुःख, हळूच सावलीत लपवून नेतो...
.......कधी स्वतःसाठी पण हसायचंय.
feelings