2025-01-06 13:31
काल एका व्यक्तिला पहिल्यांदाच भेटलो. काही कामानिमित्ताने त्यांच्याशी भेट झाली.
बरेचसे बोलणे, चर्चा, परिचय झाल्यानंतर त्यांनी मला, “तुम्ही कुठले?” असे विचारले.
मी म्हणालो, “नगर”.
प्रतिक्षिप्त क्रियेने मी विचारले, “आणि तुम्ही कुठले?”
त्यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. चेहरा क्षणात उतरला. त्यांनी आवंढा गिळला. क्षणभर इकडेतिकडे पाहू लागले आणि म्हणाले, “बीड”.
मी त्यांना सध्या बीडमध्ये घडलेल्या घटनेबद्दल काहीच विचारले नाही. मला त्यांना अवघडून टाकायचे नव्हते. मी लागलीच विषय बदलला.